नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर LCB ने घरफोड्यांचा पर्दाफाश; ७२ ग्रॅम सोने, ५३४ ग्रॅम चांदीसह ११.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – नारायण कांबळे

 

कोल्हापूर : कणेरी ता. करवीर परिसरात घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता निर्माण झालेली असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ५ घरफोडी , १ मोटारसायकल चोरीचा असे एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले असून, आरोपींकडून ७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, २ मोटर सायकल व इतर साहित्य असा एकूण तब्बल ११ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेद्वारे हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११ ते १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान कणेरी ता. करवीर परिसरातील एका बंद घराच्या कडी-कोंयडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१८/२०२६ दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.

गोपनीय माहितीने आरोपी पोलिसांच्या ताब्यात

तपास पथकाने परिसरातील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलिसांना महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून १) संतोष गाळाप्पा मुंडरगी, वय २७ रा. जुना जकात नाका, टेंबलाईवाडी, ता. करवीर, २) संतोष बाजीराव पवार, वय २१ रा. जुना जकात नाका, टेंबलाईवाडी, ता. करवीर, यांना ताब्यात घेतले.

पोलिसी चौकशीत आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून तपास केल्यानंतर दोघांनीही चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान आरोपींनी चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी त्यांच्याकडील करिझ्मा मोटारसायकलवरून टेंबलाई मंदिर परिसरातील बाजूस शाहू कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवरील येथील ठिकाणी गेल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला.

११.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

आरोपींकडून पोलिसांनी ७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, २ मीटर सायकल व इतर साहित्य असा एकूण ₹११ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कारवाईमुळे घरफोडीच्या मालिकेचा छडा लागला असून, आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

उघडकीस आलेले गुन्हे गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे गुन्हा क्र.218/26 बीएनएस 305(अ),331(4), गोकुळ शिरगाव गुन्हा क्र.246/26 डीएनएस 305(अ),331(4),कुरूंदवाड पोलीस ठाणे गुन्हा क्र.367/26 बीएनएस 305,331(4), गडहिंग्लज पोलीस ठाणे गुन्हा क्र .404/26 बीएनएस 305(अ),331(3),331(4), वडगाव पोलीस ठाणे गुन्हा क्र.414/26 बीएनएस 305(अ),331(3),331(4), वडगाव पोलीस ठाणे गुन्हा क्र. 415/26, बीएनएस 303(2)

सदर आरोपींना पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याकडून आणखी काही घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, सत्यजित तानुगडे, विशाल खराडे, शिवानंद मठपती, संदिप सावंत, सत्यजित सावंत, संजय हुंबे, संतोष बरे, गजानन गुरव, अरुण धनगर व सागर चौगुले यांच्या पथकाने केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:57 am, September 5, 2026
24°C
छितरे हुए बादल
79 %
10 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 48%
Visibility: 10 km
Sunrise: 6:15 am
Sunset: 6:44 pm
Translate »
error: Content is protected !!