नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर LCB शाखेची कारवाई;10 किलो गांजासह 6 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त.


🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल 10 किलो गांजासह एकूण 6 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांची विक्री करणारे तसेच अमली पदार्थांचा साठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी रचला सापळा!
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील व प्रदीप पाटील हे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.
गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा उचगाव परिसरात दोन संशयित इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती समोर आली. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तातडीने छापा कारवाईसाठी पथकाला सूचना दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संबंधित परिसरात सापळा रचला. संशयित घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आरोपी
१) राम मारुती सावंत (वय २१), रा. यादववाडी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.
२) राज गणेश पारखे (वय २२), रा. गणपती मंदिर शेजारी, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.
या दोघांची कायदेशीर झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजाचा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ गांजासह त्यांच्याजवळील इतर साहित्य जप्त केले.
10 किलो गांजा, दुचाकी आणि मोबाईल जप्त!
या कारवाईत पोलिसांनी दोन्ही संशयितांकडून एकूण 6 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जप्त मुद्देमालामध्ये 10 किलो गांजा, एक दुचाकी मोटारसायकल आणि तीन मोबाईल हँडसेटचा समावेश आहे. संपूर्ण मुद्देमालाचा कायदेशीर पंचनामा करून तो जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अर्थात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
गांजाचा साठा आला कुठून? विक्रीचे जाळे किती मोठे?
या कारवाईनंतर गांजाच्या पुरवठ्याबाबतही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. संशयितांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा नेमका कुठून आला, तो कोणाला विक्री करण्यात येणार होता, तसेच या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या बाबींचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या तीन मोबाईलमधूनही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीबाबतचे अधिकृत तपशील पुढील पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
ही कारवाई  पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, गांधीनगर पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, संतोष बरगे, संदिप सावंत, विशाल खराडे, शिवानंद मठपती,रवि लंबे व अन्य कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:32 am, October 17, 2026
26°C
घनघोर बादल
53 %
6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:26 am
Sunset: 6:05 pm
Translate »
error: Content is protected !!