नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बनावट विदेशी दारुची पिकअप मधुन तस्करी रोखण्यात पिंपळनेर पोलिसांना यश

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी अकिल शहा / साकिब सय्यद

साक्री : धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद सिंगुरी यांनी बनावट दारु तयार करणारे अवैध कारखान्यांचा, तसेच अवैध रित्या दारुची चोरटी वाहतुक करणाऱ्यांचा शोध घेवून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार दि.18/10/2026 रोजी सपोनि नामदेव सहारे, प्रभारी अधिकारी पिंपळनेर पोलीस ठाणे यांना गोपनीय बातमी मिळाली की, इसम विनेश उर्फ आमोश छगन ठिंगळे, रा. शेंदद्यावळ, पो. उमरपाटा, ता. साक्री हा बसरावळ गाव शिवारातील त्याचे शेतामधील राहते घरात मानवी जिवीतास अपायकारक होईल अशी बनावट विदेशी दारु चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगुन, तिची पिकअप वाहन क्रमांक MH-48/CB-2473 मधुन वाहतुक करीत आहे.

सदर बातमीचे अनुषंगाने पिंपळनेर पोलीस ठाणे येथील पथकाने छापा टाकला असता, तेथे मिळुन आलेल्या महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH-48/CB-2473 मध्ये खालील वर्णन व किंमतीचा बनावट विदेशी दारुचा साठा मिळुन आला आहे. आरोपी पोलीस आल्याचे पाहुन फरार झालेला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

1) 4,32,000 रु.कि.ची Royal Blue Whisky बनावट विदेशी दारुचे 180 ml चे एकुण 45 बॉक्स,

(एकूण 2160 क्वॉटर) (विना बॅच नंबर, विना किंमत).

2)4,50,000 रु.कि.ची महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH-48/CB-2473.

एकुण :- 8,82,000/- रु. किं.चा हस्तगत मुद्देमाल

अशाप्रकारे आरोपी विनेश उर्फ आमोश छगन ठिंगळे, रा. शेंदयावळ, पो.उमरपाटा, ता. साक्री (फरार) याचे तावे कब्जातील वाहन रु. किं. 4,50,000/- मध्ये एकुण 4,32,000/- रु. किं.ची बनावट विदेशी दारु मिळुन आल्याने पिंपळनेर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 270/2026 BNS क. 123, 336(3), 349, 350(2), 318(4) सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 67, 83 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक धुळे श्री. विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधिर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, श्री. नामदेव सहारे, प्रभारी अधिकारी-पिंपळनेर पोलीस ठाणे, पोउनि. प्रसाद रौंदळ आणि पोलीस अंमलदार बापु पिंपळे, चंद्रकांत खैरनार, कपिल पावरा, रिमा कुवर व पंकज वाघ यांनी केली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:16 am, October 22, 2026
30°C
घनघोर बादल
46 %
14 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:28 am
Sunset: 6:01 pm
Translate »
error: Content is protected !!