🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
इचलकरंजी: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावून एका सराईत चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या एकूण ४ मोपेड आणि १ मोटर सायकल असा एकूण १,१२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. १०/१०/२०२६ ते १४/०९/२०२६ या कालावधीत इचलकरंजी शहरात विविध ठिकाणाहून वाहने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, दि. २०/१०/२०२६ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची माहिती घेत असताना, पो.कॉ. सद्दाम सनदी व तुषार सूर्यवंशी यांना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, एक इसम कबनूर ओढ्या जवळ चोरीची टुनवॉल कंपनीची इलेक्ट्रीक मोपेड विकण्यासाठी येत आहे.
त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कबनूर ओढ्यावळ सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची झडती व चौकशी केली असता त्याने आपले नाव तन्वीरउलहक अब्दुलहक अंसारी (वय ३० वर्षे, रा. रोशन मर्जीद मागे, जवाहरनगर, इचलकरंजी) असल्याचे सांगितले. त्याच्याकडील इलेक्ट्रीक मोपेडबाबत विचारणा केली असता त्याने ती चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांची मोठी कारवाई आणि जप्त मुद्देमाल
तन्वीरउलहक याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने इचलकरंजी शहरातून आणखी ४ मोपेड आणि १ मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली.
एकूण मत्ता: ४ मोपेड व १ मोटर सायकल (एकूण किंमत १,१२,००० रुपये)
पोलीस पथकाचे यश
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आणासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, सह. फौजदार अनिल चव्हाण, पो.हे.कॉ. किशोर सूर्यवंशी, विकास चौगुले, शिरीष कांबळे, सद्दाम सनदी, गणेश सनदी, तुषार सूर्यवंशी व राहुल कामत यांनी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडली आहे.



