नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आकाशवाणीवरून रंगणार मिलिंद इंगळे यांच्या कलाप्रवासाचा सुरेल जागर!

(१३ नोव्हेंबरला ‘युवा स्पंदन’ कार्यक्रमात विशेष मुलाखत; निवेदक विकास पल्हाडे साधणार संवाद)

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी सिद्धार्थ वानखेडे

मुर्तिजापूर : साहित्य, कला, चित्रकला, गायन, नाट्य आणि गझल अशा विविध कलाक्षेत्रांत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविणारे मुर्तिजापूरचे सुप्रसिद्ध कवी, गझलकार, चित्रकार आणि अष्टपैलू कलावंत मिलिंद अवचित इंगळे आता थेट आकाशवाणीच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांच्या भेटीला येत आहेत. येत्या १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणी अकोलाच्या ‘युवा स्पंदन’ या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणीचे निवेदक विकास पल्हाडे या मुलाखतीत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून साहित्य आणि कला क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या मिलिंद इंगळे यांच्या बहुआयामी कलाप्रवासाचा वेध या मुलाखतीत घेतला जाणार आहे. साहित्यनिर्मितीपासून गझललेखनापर्यंत, चित्रकलेपासून गायनापर्यंत आणि नाट्यकलेपासून सामाजिक-सांस्कृतिक चळवळीपर्यंत त्यांनी केलेल्या विविधांगी कार्याचा रंजक पट यानिमित्ताने उलगडणार आहे.
केवळ कवी नव्हे, तर अनेक कलांचा संगम असलेले व्यक्तिमत्त्व!
मिलिंद इंगळे यांनी आपल्या कल्पकतेच्या, जिद्दीच्या आणि कलासक्त वृत्तीच्या जोरावर विविध क्षेत्रांत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी साहित्य चळवळीला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या पुढाकारातून आतापर्यंत तीन यशस्वी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलने दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत पार पडली आहेत. ही त्यांच्या साहित्यिक आणि संघटनात्मक कार्याची उल्लेखनीय उपलब्धी मानली जाते.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे अनुभव, संघर्ष, यशापयश आणि कलाक्षेत्रातील वाटचाल याविषयी या मुलाखतीत विशेष चर्चा रंगणार आहे. त्यांच्या सुमधुर वाणीतील अनुभवकथन आणि कलाप्रवासातील काही अविस्मरणीय आठवणी श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत.
मिलिंद इंगळे यांच्या आकाशवाणीवरील या विशेष मुलाखतीबद्दल साहित्यिक, कलावंत, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ, सृजन साहित्य संघ, गझलदीप प्रतिष्ठान, अंकुर साहित्य संघ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्था, जनग्रामीण पत्रकार संघ, एकता बेरोजगार मजूर संघटना तसेच पेंटर व चित्रकार संघटनेसह विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मुर्तिजापूरच्या मातीतून उभे राहिलेले एक बहुआयामी कलावंत व्यक्तिमत्त्व आकाशवाणीच्या माध्यमातून राज्यभरातील श्रोत्यांपर्यंत पोहोचणार असल्याने ही मुर्तिजापूरकरांसाठी निश्चितच अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरणार आहे.
कार्याचा गौरव, कलेचा सन्मान आणि संघर्षमय प्रवासाची कहाणी ऐकण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणी अकोलाच्या ‘युवा स्पंदन’ कार्यक्रमाला नक्की कान द्या!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:07 am, November 12, 2026
25°C
साफ आकाश
32 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:39 am
Sunset: 5:50 pm
Translate »
error: Content is protected !!