नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मानाचा १०८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न


🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी सिद्धार्थ वानखडे


मूर्तिजापूर:- युनियन बँक ऑफ इंडियाच्या माना शाखेच्या वतीने बँकेचा १०८ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. १९८१ मध्ये सुरू झालेल्या माना शाखेने ग्राहकांच्या विश्वासावर आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवल्याचे याप्रसंगी नमूद करण्यात आले.
विशेष म्हणजे, युनियन बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. आज ही बँक देश-विदेशात विस्तृतपणे कार्यरत आहे. या खास निमित्ताने बँक परिसर आकर्षक फुगे आणि सुंदर सजावटीने मढविण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात शाखा व्यवस्थापक मनीष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बँकेचे कर्मचारी गजेंद्र डमवाल, दीपक गोवर, गौरव ठाकरे, अरुण पवार, काजल राऊत, रेश्मा मंडळ यांच्यासह मोठ्या संख्येने खातेधारक, ग्रामस्थ आणि ग्राहक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बँकेच्या १०८ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर उपस्थितांच्या उपस्थितीत केक कापून आणि सत्कार सोहळ्याने वर्धापन दिन साजरा करण्यात आला. बँकेने नेहमीच सर्वसामान्यांना उत्कृष्ट व विश्वासाची बँकिंग सेवा दिली असून, यापुढेही ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ वानखडे यांनी केले, तर शेवटी उपस्थितांचे आभार मानून सर्वांना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:17 pm, November 11, 2026
27°C
साफ आकाश
29 %
5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 2%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm
Translate »
error: Content is protected !!