नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

APK लिंकद्वारे सायबर फसवणूक; तक्रारदाराचे ६.२८ लाख रुपये परत मिळवण्यात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांना यश

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी योगेश गवळे

नाशिक :- मोबाईलवर mParivahan.apk या नावाची बनावट लिंक पाठवून व्हॉट्सॲप हॅक करत क्रेडिट कार्डमधून तब्बल ६ लाख २८ हजार ६५८ रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका सायबर भामट्याला नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी गोव्यातून अटक केली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम तक्रारदाराला परत मिळवून देण्यात यश आले आहे.
मालेगाव येथील तक्रारदाराला व्हॉट्सॲपवर mParivahan.apk नावाची लिंक पाठवण्यात आली होती. तक्रारदाराने लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांचे व्हॉट्सॲप हॅक करण्यात आले. त्यानंतर मोबाईल क्रमांकाशी लिंक असलेल्या क्रेडिट कार्डमधून ६,२८,६५८ रुपये परस्पर हस्तांतरित करून आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(क), ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीची ओळख पटवून पुष्पेंद्र गणेशकुमार प्रसाद उर्फ विहान मल्होत्रा, रा. करकरडुमा, पूर्व दिल्ली, याला हेरिटेज व्हिलेज रिसॉर्ट, साऊथ गोवा येथून अटक करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे फसवणुकीची ६ लाख २८ हजार ६५८ रुपयांची संपूर्ण रक्कम तक्रारदाराला परत मिळवून देण्यात आली.
नागरिकांनी अनोळखी लिंकपासून सावध राहावे
नाशिक ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींच्या फोन कॉलवर विश्वास ठेवू नये, बँक खाते, कार्ड किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, तसेच मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन केले आहे.
सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० किंवा १९४५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याशी ०२५३-२२००४०८ / ७६६६३१२११२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
महत्त्वाचे : दिलेल्या संशयित cutt.ly लिंकवर नागरिकांनी क्लिक करू नये.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:27 am, October 2, 2026
26°C
साफ आकाश
50 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:21 am
Sunset: 6:18 pm
Translate »
error: Content is protected !!