नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इन्स्टाग्रामवर शस्त्रासह फोटो टाकून दहशत माजवणारा अमरावतीत जेरबंद; राजापेठ पोलिसांची धडक कारवाई

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी मिलिंद इंगळे 

अमरावती: सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना राजापेठ पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. इन्स्टाग्रामवर एका प्राणघातक चाकूसह स्वतःचा फोटो व्हायरल करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करणाऱ्या २१ वर्षीय युवकाला राजापेठ पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. संकेत उमेश वानखेडे (वय २१ वर्षे, रा. दसरा मैदान, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०८ जुलै २०२६ रोजी राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांना एका युवकाने हातात घातक चाकू घेऊन इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. हा प्रकार समाजात दहशत निर्माण करणारा असल्याने, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी राजापेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

मांडवा झोपडपट्टीतून आरोपीला ठोकल्या बेड्या

आदेश मिळताच डी.बी. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. पथकाने दसरा मैदान परिसरातील मांडवा झोपडपट्टी येथे सापळा रचून आरोपी संकेत वानखेडे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून सुमारे १३.८ इंच लांबीचा स्टीलचा घातक चाकू जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे ₹२,०००/- आहे.

गुन्हा दाखल

सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे आरोपीला महागात पडले आहे. याप्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशन येथे आरोपी संकेत वानखेडे याच्याविरुद्ध कलम ४/२५ शस्त्र अधिनियम (Arms Act) तसेच कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) श्याम घुगे तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व राजापेठ डी. बी. पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.  पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे अमरावतीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:07 am, July 19, 2026
29°C
घनघोर बादल
59 %
13 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!