नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

एमआयडीसी कुपवाड पोलिसांची रोडरोमिओंवर धडक कारवाई

विनानंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि ट्रिपलसीटवर कारवाई; ४२ दुचाकीस्वारांकडून ४२,५०० रुपयांचा दंड वसूल

🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी-राजेंद्र पवार ✍️ 

सांगली :- सांगली जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या वतीने रोडरोमिओंविरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विनानंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि ट्रिपलसीट प्रवास करणाऱ्या ४२ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून ४२,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय, पूर्वीचा प्रलंबित १३,५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

ही मोहीम पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी विशेष पथके तयार करून कुपवाड येथील जुना जकात नाका मुख्य रस्त्यावर अचानक नाकाबंदी व गस्त घालत ही कारवाई केली. तपासणीदरम्यान वाहनांची कागदपत्रे, चालकांची ओळख आणि वाहनांची वैधता पडताळण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात, फौजदार कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरुटे तसेच सस्गर, मुळीक, कोळी, वाकडे, सावंत, शिंदे, दाभाडे, कांबळे, मधुकर कांबळे, कोथळे, यमगर, शहा आणि संदीप घस्ते यांनी सक्रिय सहभाग घेतला.

सांगली जिल्हा पोलीस दलाकडून अशा प्रकारच्या धडक मोहिमा भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विनानंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपलसीट प्रवास करणारे वाहनचालक तसेच संशयित व्यक्ती अथवा वाहनांची माहिती नागरिकांनी तातडीने डायल ११२ वर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:23 am, July 19, 2026
30°C
घनघोर बादल
53 %
10 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 5:59 am
Sunset: 7:14 pm
Translate »
error: Content is protected !!