🚨DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी-राजेंद्र पवार ✍️
मिरज : मिरज शहरातील सुभाषनगर (हुळुळे प्लॉट) परिसरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाळीव शेळीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजकुमार रामचंद्र अलगुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकाश गणेश हाके (वय २६, रा. हुळुळे प्लॉट, सुभाषनगर, मिरज) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपी फिर्यादीच्या घराशेजारील शेडमध्ये शिरला. तेथे बांधलेल्या पाळीव शेळीवर त्याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.



