नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चारित्र्याच्या संशयातून महिलेची दगडाने ठेचून हत्या; आरोपी अटकेत!

पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई; सावरगाव शिवारातील शेतातील गोठ्यातून घेतले ताब्यात

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी परवेज शेख 

धाराशिव : चारित्र्यावर संशय घेत पत्नीची चैन आणि दगडाने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपीला कळंब पोलिसांनी अटक केली आहे. गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला पुनर्वसन सावरगाव शिवारातील एका शेतातील गोठ्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान हासेगाव शिवारातील सुमानधने पेट्रोल पंपासमोरील शेतात कोमल गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे यांची हत्या करण्यात आली होती. चारित्र्यावर संशय घेत आरोपीने चैन व दगडाने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना ठार मारल्याची फिर्याद बंडू विश्वंभर पवार (वय ५१, रा. करंजकल्ला, ता. कळंब) यांनी ८ ऑक्टोबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. मात्र, आरोपी वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक ठरत होते. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने पुनर्वसन सावरगाव शिवारातील शेतातील गोठ्यात छापा टाकून आरोपी गणेश उर्फ विनायक टेकाळे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बजबळकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस अंमलदार अनिल भोसले, किरण माळी, औदुंबर गजबार व सुनील तारळकर यांचा समावेश होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:39 pm, November 5, 2026
31°C
साफ आकाश
27 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:35 am
Sunset: 5:53 pm
Translate »
error: Content is protected !!