नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांवर चंदगड पोलिसांची कारवाई १७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड

चंदगड तालुक्यातील शेवाळे गावच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या तिघांवर चंदगड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या, दोन मोबाईल फोन आणि महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप असा एकूण १७ लाख १ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१८/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपींमध्ये जयवंत चाळु गावडे, सुधाकर नामदेव गावडे आणि शिवाजी धाकलु गावडे, तिघेही रा. पार्ले, ता. चंदगड, जि. कोल्हापूर, यांचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास शेवाळे गावच्या हद्दीत विलास शंकर तुपारे यांच्या शेतासमोरील रस्त्याच्या कडेला महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप क्रमांक MH-09-GJ-8571 थांबविण्यात आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूच्या सिलबंद बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये Reserve 7, Golden & Black XXX Rum, DSP Black Deluxe Whisky, Green Apple Vodka, Royal Stag, Royal Challenge, Haywards, Macdonald No.1 Original Whisky, Golden Ace Blue Fine Whisky, Caju Feni, Magic Movements, Old Monk XXX Rum, Reals XXX Rum, Bagpipers Whisky तसेच Kingfisher Strong Premium Beer आदींचा समावेश आहे.या कारवाईत विविध आकाराच्या दारूच्या बाटल्या व बीअरचे टिन, तसेच आरोपींचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आरोपींनी संगनमताने गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी वाहतूक केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र शासनाचा कर चुकविण्याच्या उद्देशाने दारूची वाहतूक सुरू असताना पोलिसांची कारवाई झाली. पोलिसांना पाहताच आरोपी क्रमांक एक जयवंत गावडे हा वाहनातून उतरून शेताच्या दिशेने पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई), ९०, १०८, ८३ तसेच मोटार वाहन कायदा कलम २३९/१७७, ५०/१७७ व १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १७ लाख १ हजार १३० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत असून, वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:29 am, September 26, 2026
26°C
घनघोर बादल
72 %
27 Km/h
Wind Gust: 52 Km/h
Clouds: 96%
Visibility: 10 km
Sunrise: 6:20 am
Sunset: 6:24 pm
Translate »
error: Content is protected !!