नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पै. रवींद्र आघाव यांच्या पाठपुराव्याला यश; जवाहर नेहरू स्टेडियमचे काम अंतिम टप्प्यात

आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नातून २ कोटी ८५ लाखांचा निधी उपलब्ध; उत्तर महाराष्ट्रातील मल्लांमध्ये आनंदाचे वातावरण

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी संदीप अहिरे

धुळे : उत्तर महाराष्ट्रातील कुस्तीपटूंचे हक्काचे मैदान म्हणून ओळखले जाणारे धुळे येथील जवाहर नेहरू स्टेडियम गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होते. या स्टेडियमच्या दुरुस्ती व नूतनीकरणाची मागणी सातत्याने होत होती. अखेर धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पैलवान यांच्या अथक प्रयत्नांना आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, जवाहर नेहरू स्टेडियमच्या कामाने आता अंतिम टप्पा गाठला आहे.

या महत्त्वपूर्ण कामासाठी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी विशेष पुढाकार घेत २ कोटी ८५ लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम मार्गी लागले आहे.

जवाहर नेहरू स्टेडियम हे धुळे शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील मल्लांसाठी महत्त्वाचे क्रीडा केंद्र आहे. या ठिकाणी कुस्तीच्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे स्टेडियमचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर मल्लांना आधुनिक व चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या कामासाठी सातत्याने प्रयत्न करणारे तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पैलवान आणि निधी उपलब्ध करून देणारे आमदार अनुप अग्रवाल यांचे धुळेकर नागरिकांसह उत्तर महाराष्ट्रातील कुस्तीपटूंकडून मनःपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:03 pm, November 12, 2026
27°C
साफ आकाश
27 %
10 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:39 am
Sunset: 5:50 pm
Translate »
error: Content is protected !!