नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बिलोलीत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा रूट मार्च; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शक्ती प्रदर्शन

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी साईनाथ खंडेराय

नांदेड :-

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी बिलोली पोलीस ठाण्याच्या वतीने आज शहरातून भव्य रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चचे नेतृत्व बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. बाळासाहेब रोकडे यांनी केले. यावेळी सह पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी, पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक सुरज तिडके यांच्यासह पोलीस अंमलदार, SRPF चे जवान आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी सहभाग घेतला होता.
बिलोली शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, विसर्जन मार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी हा यामागचा उद्देश होता.
पोलीस निरीक्षक रोकडे यांचे आवाहन:
“गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये, याची दक्षता सर्व गणेश मंडळांनी घ्यावी. आपले विसर्जन दिलेल्या वेळेतच करून घ्यावे आणि प्रशासनास सहकार्य करावे,” असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी यावेळी केले आहे.
पोलीसांच्या या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:21 am, September 25, 2026
27°C
टूटे हुए बादल
68 %
10 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 74%
Visibility: 10 km
Sunrise: 6:20 am
Sunset: 6:25 pm
Translate »
error: Content is protected !!