नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पेठ वडगावात मध्यरात्री शस्त्रांचा साठा जप्त; गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, तलवार अन् सुरीसह तिघे जेरबंद!

नंबर प्लेट लपवून फिरणारी काळी स्कॉर्पिओ पोलिसांनी अडवली; ६ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे

कोल्हापूर :- पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथे मध्यरात्रीच्या सुमारास वडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, धारदार तलवार आणि सुरी बाळगणाऱ्या तिघांना अटक केली. नंबर प्लेट लपवून फिरणाऱ्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वाहनासह मोबाईल व शस्त्रे असा एकूण ६ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ही कारवाई सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.४० वाजण्याच्या सुमारास वडगाव नगरपरिषद चौकात करण्यात आली. नितीन महिपती विरकर (वय २७, रा. मसाईवाडी, म्हसवड), विजय तुकाराम नरळे (वय २५, रा. जांभोळणी, पो. पुळकुटी) आणि तानाजी गिरजाप्पा विरकर (वय ३६, रा. मसाईवाडी, म्हसवड, तिघेही ता. माण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टा (जि. सांगली) येथून काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नोंदणी क्रमांक लपवून येत असून, त्यामध्ये पिस्तूल व जिवंत काडतूस असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार शरद मेनकर यांना बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत वडगाव पोलिसांनी नगरपरिषद चौकात सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ अडवून त्यातील तिघांना जागेवरच ताब्यात घेतले.

वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये लोखंडी धातूचे देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, ४२ सेंटीमीटर पात्याची लोखंडी धारदार तलवार आणि १७.५ सेंटीमीटर पात्याची स्टेनलेस स्टीलची धारदार सुरी आढळून आली. याशिवाय ओप्पो, आयफोन आणि विवो कंपनीचे प्रत्येकी एक मोबाईल तसेच एमएच ०९ बीएक्स १७८८ क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ६ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३१/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ आणि भारतीय न्याय संहिता कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पेठ वडगाव यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक खलील इनामदार, सहायक फौजदार आबासो गुंडणके, सहायक फौजदार गावंडे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस अंमलदार शरद मेनकर, अनिल आष्टेकर, महेश गायकवाड, नितीन जाधव, संतोष कांबळे आणि शेखर कदम यांचा समावेश होता.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार आबासो गुंडणके करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:41 pm, November 10, 2026
26°C
साफ आकाश
32 %
5 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:37 am
Sunset: 5:51 pm
Translate »
error: Content is protected !!