नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बंद घरातील चोरीचा प्रयत्न उधळला; आनंदनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दागिने सुरक्षित!

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी परवेज शेख

म्हाडा कॉलनीतील घराचे कुलूप तोडून चोरट्यांचा प्रवेश; पोलिसांनी कपाटातील गुप्त कप्प्यातून शोधले सोने-चांदीचे दागिने

धाराशिव : शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली. मात्र, आनंदनगर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे घरातील मौल्यवान सोने-चांदीचे दागिने सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घराची बारकाईने तपासणी करत कपाटातील गुप्त कप्प्यातून सर्व दागिने शोधून काढले. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून हे दागिने नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनी येथील महेंद्रसिंग राजपूत यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून सामानाची नासधूस व अस्ताव्यस्त केल्याचे निदर्शनास आले. चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच आनंदनगर पोलिसांना कळविण्यात आले.

घटनेचे गांभीर्य ओळखून आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून एक पथक घटनास्थळी तपासणीसाठी, तर दुसरे पथक अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना केले.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घराची बारकाईने पाहणी केली. महेंद्रसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार घरातील सोने-चांदीच्या दागिन्यांचा शोध घेण्यात आला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे कपाटातील गुप्त चोर कप्प्यात सर्व दागिने सुरक्षित असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी दागिन्यांबाबत आवश्यक ती ताबा पावतीची प्रक्रिया पूर्ण करून ते महेंद्रसिंग राजपूत यांचे नातेवाईक श्रावण बुद्धाराम जांगिड, रा. भगवान बाबा नगर, एमआयडीसी, धाराशिव यांच्या स्वाधीन केले.

ही कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल अजहर काझी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अत्तार, पोलीस अंमलदार टिकोरे, गिराम, मसाळ, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख आणि होमगार्ड गुरफुळे यांनी पार पाडली.

बंद घरात चोरीचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि घटनास्थळी केलेली बारकाईची तपासणी यामुळे मौल्यवान दागिने सुरक्षित मिळाले. आनंदनगर पोलिसांच्या या कर्तव्यदक्ष कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:25 pm, November 10, 2026
25°C
साफ आकाश
33 %
5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:37 am
Sunset: 5:51 pm
Translate »
error: Content is protected !!