नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले एकाचा मृत्यू, दोघे जखमी


🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संदीप सकट चंदगड

कोल्हापूर :- चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी गावाजवळ मेगा कंपनीसमोरील वळणावर एमजी अॅस्टर कार उलटून झालेल्या भीषण अपघातात विनायक नेताजी कलिंग (रा. बेनकनहळ्ळी, जि. बेळगाव) यांचा मृत्यू झाला. तर पप्पू गंगाराम भोसले हे गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) रात्री सव्वानऊच्या सुमारास घडला.पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू भोसले, जयंत कामु, विनायक कलिंग आणि मयूर कांबळे हे चौघेजण चंदगड तालुक्यातील आंबेवाडी येथील धरण परिसरात फिरण्यासाठी एमजी अॅस्टर कारमधून (क्र. 22BH8822F) बेळगाव-वेंगुर्ला मार्गाने जात होते. जंगमहट्टी गावाजवळ मेगा कंपनीसमोरील वळणावर अचानक कारसमोर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक मयूर कांबळे याचा कारवरील ताबा सुटला. कार रस्त्याच्या कडेला असलेल्या कापलेल्या झाडाच्या बुंध्याला जोरात धडकून उलटली. त्यानंतर रस्त्यावर घसरत जाऊन पुन्हा पलटी झाली.
अपघातात पप्पू भोसले यांच्या डाव्या खांद्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. विनायक कलिंग हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कारमधील मयूर कांबळे आणि जयंत कामु यांनाही किरकोळ दुखापत झाली.याप्रकरणी जखमी पप्पू भोसले यांनी दिलेल्या जबाबावरून चंदगड पोलिस ठाण्यात चालक मयूर बसय्या कांबळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षकांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक गांगजे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
9:20 pm, November 11, 2026
27°C
साफ आकाश
29 %
6 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm
Translate »
error: Content is protected !!