🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापुर :- जिल्हा परिषद समोरील रस्त्यावर एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून आणि हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास करणाऱ्या पुणे येथील महिला आरोपीला शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
* घटनेचा तपशील: २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास कस्तुरी शामराव अथनिकर (वय ६५, रा. कदमवाडी, कोल्हापूर) या जिल्हा परिषद समोरील रस्त्याने जात होत्या. यावेळी अज्ञात महिला आरोपीने त्यांच्याशी ओळख निर्माण करून त्यांना बोलण्यात गुंतवले आणि हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील दीड ग्रॅम वजनाचे, दोन वाट्या व चार मणी असलेले सोन्याचे गंठण (किंमत ६०,००० रुपये) काढून घेत फसवणूक केली.
* अटकेची कारवाई: या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक श्री. संतोष डोके यांनी दोन विशेष तपास पथके तयार केली. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तपास करत संशयित महिला आरोपी कमल उर्फ कमू गोपीचंद शिंदे (वय ५५, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) हिला ताब्यात घेतले.
* मुद्देमाल हस्तगत: अटकेनंतर पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेले ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जप्त केले आहे.
* कारवाई करणारे पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिजीत आटपाडकर यांच्यासह पोलीस अंमलदार सुशिलकुमार गायकवाड, महेश पाटील, अमोल पाटील, सनिराज पाटील, राहुल पाटील, कृष्णात पाटील, गौरव शिंदे, प्रशांत आवळे, रवि आंबेकर आणि शितल यादव यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिजीत आटपाडकर करीत आहेत.



