नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

आसरा नगर नागरी समस्यांच्या विळख्यात महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी महापौरांना निवेदन.


🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – निवास गागडे

इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील साईट नंबर १०२ व ३००, आसरा नगर परिसरातील नागरिकांना विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत असून, मूलभूत सुविधांअभावी नागरिकांची गैरसोय होत आहे. या समस्यांची तातडीने सोडवणूक करावी, अशी मागणी दलित समाज विकास परिषद यांच्या वतीने महापौर उदयजी धातुंडे यांच्याकडे परिषदेचे शहर संघटक बाळकृष्ण हत्तीकर यांनी निवेदन सादर केले आहे. परिसरातील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्या
साठी आमदार राहुलजी प्रकाश आवाडे यांच्या विशेष निधीतून बोअरवेलची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अद्याप या बोअरवेलला आवश्यक पाणी कनेक्शन व संबंधित व्यवस्था उपलब्ध झालेली नसल्याने नागरिकांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.याशिवाय परिसरात नियमित कचरा उठाव होत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. गटारींची स्वच्छता व दुरुस्ती होत नसल्याने सांडपाणी आणि दुर्गंधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यालगत वाढलेले गवत व झाडेझुडपे यामुळेही नागरिक त्रस्त आहेत.
परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, तेथे स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आवश्यक दुरुस्ती करण्याची गरज आहे. तसेच अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व समस्यांबाबत महापौरांनी स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्याचे आदेश द्यावेत. बोअरवेलला तातडीने पाणी कनेक्शन द्यावे, नियमित घंटागाडी सुरू करावी, कचरा उठाव, गटार स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, सार्वजनिक शौचालयाची देखभाल आणि बंद पथदिवे सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.आसरा नगरमधील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन निश्चित कालमर्यादेत उपाययोजना कराव्यात. अशी मागणी बाळकृष्ण हत्तीकर यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती महापालिका आयुक्त, प्रभाग अधिकारी तसेच पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता आणि विद्युत विभागाला देण्यात आल्या आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:10 am, November 22, 2026
22°C
साफ आकाश
41 %
5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:45 am
Sunset: 5:48 pm
Translate »
error: Content is protected !!