नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कष्ट, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर हर्षल सोनवणे यांची मर्चंट नेव्हीत भरारी!

हर्षलचा संघर्षातून सुरू झालेला प्रवास थेट मरीन इंजिनिअरपदापर्यंत; वडिलांच्या संघर्षाचे स्वप्न मुलाने केले साकार

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी संदीप अहिरे 

धुळे : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मनात जिद्द, मेहनतीची तयारी आणि ध्येय गाठण्याची चिकाटी असेल तर यशाला गवसणी घालता येते, याचा प्रत्यय धुळ्यातील हर्षल प्रल्हाद सोनवणे यांच्या यशोगाथेतून येतो. शिरपूर तालुक्यातील बलकुवे या छोट्याशा गावातून आलेल्या आणि सध्या धुळ्यात वास्तव्यास असलेल्या हर्षल यांनी आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर मर्चंट नेव्हीमध्ये मरीन इंजिनिअर म्हणून निवड होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह धुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

वडिलांचा संघर्ष, मुलाच्या यशाचा भक्कम पाया!

हर्षल यांचे वडील प्रल्हाद सोनवणे हे नाभिक समाजातील असून, मूळचे बलकुवे गावचे रहिवासी आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी धुळे शहर गाठले. येथे एका छोट्याशा सलून दुकानाच्या माध्यमातून त्यांनी संसाराचा गाडा हाकण्यास सुरुवात केली. मर्यादित साधने आणि अनेक अडचणी असूनही मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.

सलून व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा अनेक वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षकांशी परिचय झाला. या मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ हर्षल यांच्या शैक्षणिक प्रवासात झाला. वडिलांच्या कष्टांची जाणीव आणि कुटुंबाच्या अपेक्षा मनात ठेवून हर्षल यांनी धुळ्यातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

नोकरी सांभाळून अभ्यास, जिद्दीने गाठले यशाचे शिखर!

हर्षल यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी संपादन केली. पदवीनंतर खासगी कंपनीत नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी मोठे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून अभ्यास सुरूच ठेवला. नोकरी आणि अभ्यास यांचा समतोल साधत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या मेहनतीला यश आले आणि मर्चंट नेव्हीमध्ये मरीन इंजिनिअर म्हणून निवड झाली.

एका छोट्याशा सलून दुकानातून सुरू झालेल्या संघर्षमय प्रवासाला मुलाच्या यशाने नवे शिखर मिळाले आहे. प्रल्हाद सोनवणे यांनी पाहिलेले स्वप्न हर्षल यांनी आपल्या मेहनतीने प्रत्यक्षात उतरवले आहे. ही यशोगाथा केवळ एका कुटुंबाची नसून, परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

मान्यवरांकडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

हर्षल यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे ओएसडी तात्यासाहेब नरेंद्र कुलकर्णी, आर्थिक गुन्हे शाखेचे श्रीकांत पाटील आणि प्रभाकर बैसाने यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांनी हर्षल यांना पुढील करिअरविषयी मार्गदर्शन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

वडिलांच्या घामाला मुलाच्या कर्तृत्वाची जोड मिळाली आणि संघर्षाचे रूपांतर अभिमानास्पद यशात झाले! हर्षल सोनवणे यांची ही भरारी नव्या पिढीला स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी ठरत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:05 am, November 23, 2026
24°C
साफ आकाश
55 %
7 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:45 am
Sunset: 5:48 pm
Translate »
error: Content is protected !!