नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजी शहरात ऊस वाहतूक व अवजड वाहनांना मुख्य रस्त्यांवर बंदी; वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्ग निश्चित.


🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे

इचलकरंजी (दि. २५ नोव्हेंबर २०२६) : इचलकरंजी शहर आणि परिसरातील ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉली आणि बैलगाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि संभाव्य अपघात रोखण्यासाठी इचलकरंजी शहर वाहतूक शाखेने मोठा निर्णय घेतला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांसह अवजड वाहनांना शहरातील मुख्य रस्त्यांवरून प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली असून, त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. 
वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका टाळण्यासाठी कारवाई
इचलकरंजी शहरालगत असलेले जवाहर साखर कारखाना हुपरी, पंचगंगा साखर कारखाना कबनूर, दत्त साखर कारखाना शिरोळ, शरद साखर कारखाना नरंदे आणि गुरुदत्त साखर कारखाना टाकळीवाडी या कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होते. ही वाहतूक इचलकरंजी शहरातून होत असल्याने प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक शाखेने हे पाऊल उचलले आहे. 
वाहनधारक व चालकांना पर्यायी मार्गांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी प्रत्येक मार्गावर फलक लावण्यात आले आहेत. चालकांनी या फलकांवरील सूचनांचे पालन करून निर्धारित पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
निश्चित करण्यात आलेले पर्यायी मार्ग
पंचगंगा नदीकडून येणारी ऊस वाहतूक व अवजड वाहने : मर्गूबाई मंदिर – नायरा पेट्रोल पंप – वैरण बाजार – लिंबू चौक – कल्लानगर पोलीस लाईन – रिंग रोड – शाहू पुतळा – अटलबिहारी वाजपेयी चौक – डेक्कन चौक – पंचगंगा साखर कारखाना. 
चंदूरकडून येणारी ऊस वाहतूक व अवजड वाहने : चंदूर – आभार फाटा – शाहूनगर – किसान चौक – वैरण बाजार – नायरा पेट्रोल पंप – मर्गूबाई मंदिर. 
यड्राव फाट्याकडून येणारी ऊस वाहतूक व अवजड वाहने : यड्राव फाटा – तारदाळ नाका – शहापूर – जी. के. नगर चौक – तुळजाभवानी चौक – पंचगंगा साखर कारखाना. 
टाकवडेकडून येणारी वाहने (जवाहर साखर कारखान्याकडे जाण्यासाठी) : पी. बी. पाटील मळा – नवीन बायपास रोड – नदीवेस नाका – पंचगंगा पूल – रांगोळी – रेंदाळ – जवाहर साखर कारखाना. 
टाकवडेकडून येणारी वाहने (पंचगंगा साखर कारखान्याकडे जाण्यासाठी) : टाकवडे – विजय कृषी केंद्र – कारखाना कचरा डेपो – एस. आय. टी. कॉलेज चौक – सोलगे मळा – कारंडे मळा – शहापूर चौक – मलाबादे नगर चौक – तुळजाभवानी अपार्टमेंट चौक – बालाजी बेकरी – सावळी सोसायटी – पंचगंगा साखर कारखाना. 
या चौक व रस्त्यांचा वापर करण्यास मनाई
ऊस वाहतूक करणारी वाहने आणि अवजड वाहनांनी कोणत्याही परिस्थितीत महात्मा गांधी चौक, राजवाडा चौक, गांधी पुतळा, जनता चौक, पंत बाळेकुंद्री, संभाजी चौक, उत्तम प्रकाश टॉकीज चौक, तीन बत्ती चौक, शिवतीर्थ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या चौक व रस्त्यांचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 
सर्व ऊस वाहतूकदार, वाहनमालक व वाहनचालकांनी वाहतुकीचे नियोजन करताना वरील पर्यायी मार्गांचाच अवलंब करून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहर वाहतूक शाखेस सहकार्य करावे, असे आवाहन इचलकरंजी शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:20 pm, November 25, 2026
25°C
छितरे हुए बादल
39 %
9 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 27%
Visibility: 10 km
Sunrise: 6:47 am
Sunset: 5:48 pm
Translate »
error: Content is protected !!