नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कवठा शेलू येथे बुद्धमूर्तीची स्थापना

प्रा. अंजलीताई आंबेडकर यांचा करुणा, शिक्षण व वैचारिक प्रबोधनाचा संदेश

( कवठा गावातुन पुष्प वर्षावाने धम्म रॅली काढून बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली)

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

मिलिंद इंगळे जिल्हा प्रतिनिधी

मूर्तिजापूर : – कवठा शेलू येथे एकता असंघटित बांधकाम मजूर असोसिएशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहु. संस्था कवठा शेलू या संस्थे मार्फत कालकथित हिम्मतराव बाळाजी डोंगरदिवे यांच्या स्मरणार्थ धम्म रॅली व बुध्द मूर्ती स्थापनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उद्घाटक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या मातृतुल्य अंजलीताई आंबेडकर वेळेवर उपस्थित होत्या त्यांनी उद्घाटकीय भाषणात
त्यांनी बुद्ध, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतीची जोड देण्याचे आवाहन केले.
समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होत असल्यास त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हीच खरी करुणा आहे. तसेच शिक्षणातून माणसाला चिकित्सक विचारांची दृष्टी प्राप्त होते. महात्मा फुले यांनी शिक्षणाला ‘तिसरा डोळा’ संबोधले असून, त्यातून सामाजिक परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता निर्माण होते, असे प्रा. आंबेडकर यांनी सांगितले.
निवडणुकीच्या काळातही संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि न्यायाचा विचार करून मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. बुद्ध, फुले आणि बाबासाहेबांच्या विचारांचा केवळ जयजयकार न करता तो व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात अंगीकारणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच उपवर्गिकरणाचा जो परस्परविरोधी निंदनीय प्रकार चालू आहे, ते अशोभनीय आहे, ते कुठे तरी थांबले पाहिजे, हे आजचे राजकारण फक्त जाती धर्मावर केले जाते आणि सत्तेत येऊन पुन्हा वंचित घटकांत वाद लावण्याचा काम बीजेपी करत आहे, असा टोला लगावला. यासाठी आपण या भानगडीत न पडता आपल्या एकत्र येण्याची खुप गरज आहे.
अंजलीताईचे भाषण ऐकण्यासाठी महिला वर्ग सर्वात जास्त उपस्थित होता .
त्या नंतर प्रमुख उपस्थिती म्हणून.
वंचितच्या राष्ट्रीय सदस्य अरुंधतीताई सिरसाठ, जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे, माजी तालुकाध्यक्ष संजयभाऊ नाईक, मुर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील भाऊ सरदार. महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, महिला तालुका प्रमुख लक्ष्मीबाई वानखडे,
ज्येष्ठ साहित्यिका सुनिता इंगळे, सौ.सुकेशनी दिनेश डोंगरदिवे, दिनेश हिम्मत डोगंरदिवे, नरेंद्र मेश्राम, गौतम बगाडे,शिक्षक संतोष डोंगरदिवे उपस्थित होते,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप डोंगरदिवे यांनी केले व उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी समाजाबद्दल मनोगत व्यक्त केले.
सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांना शाल गुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पुज्य राजज्योती भंते हे कार्यक्रमाचे धम्मदेसना साठी विशेष उपस्थिती होती त्यांनी प्रेक्षकांच्या भोजनानंतर उपस्थित लोकांना प्रवचन दिले.
या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन साहित्यीक मिलिंद अवचित इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन तायडे यांनी मानले.
जनग्रामिण पत्रकार संघामार्फत सुनील वानखडे पत्रकार, सिद्धार्थ वानखडे पत्रकार, प्रफुल भटकर पत्रकार, सतीश मनवर पत्रकार, सुदर्शन शिरसाठ पत्रकार, विजय इंगळे पत्रकार, कनिष्क गवई पत्रकार, धम्मपाल नाईक व जनग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद अवचित इंगळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन एकता असंघटित बांधकाम मजूर असोसिएशन मुर्तिजापूर, जनग्रामिण पत्रकार संघ, न्यु सिध्दार्थ युवा मंडळ कवठा, विशाखा महिला मंडळ कवठा, किसा गौतमी संघ सालतवाडा,यांनी केले होते.

या गावातील बुध्द विहारासाठी दिनेश डोंगरदिवे यांनी पुढाकार घेतला आहे.
ते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते.

गायक धम्मा राऊत, सुदर्शन शिरसाट, योगेश वाहुरवाघ, विपुल गोपनारायण, मंगेश गवई, अरविंद इंगळे, अंकित थोरात यांचा आदल्या दिवशी परिवर्तनवादी गीत गायनचा कार्यक्रम घेण्यात आला.
साहित्यिक मिलिंद अवचित इंगळे यांनी त्यांचे स्वलिखित “तिच्या उदरी तिच्या पदरी” हे काव्यसंग्रह प्रा. अंजली ताई आंबेडकर यांना सप्रेम भेट देऊन स्वागत केले.

अरूण वानखडे मुख्य संचालक तथागत टि व्हि चॅनल अमरावती, वंदना खोब्रागडे महिला प्रमुख, सुनिता ताई रायबोले जिल्हा महिला प्रमुख, सुलोचना ताई गुडधे अमरावती प्रतिनिधी,लताबाई वानखडे मुख्य संचालक, ईश्वर यादव कॅमेरामन, भगवान घने कानडी, वसंत बेलोकार कानडी, संवर्धन दत्तराज डोंगर दिवे,उद्धव डोंगरदिवे,सिमा गौतम बगाडे मुंबई, यशवंत डोंगरदिवे,बंडु डोंगरदिवे, शरद वानखडे मोझरी, महेंद्र हिम्मतराव डोंगरदिवे सुरत, विठ्ठल डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, प्रवीण डोंगरदिवे सुमेध नाईक,
या कार्यक्रमामध्ये संपूर्ण गावकरी , वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते,महिला मंडळ व पत्रकार जास्तीत जास्त उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
3:39 am, September 23, 2026
27°C
घनघोर बादल
75 %
14 Km/h
Wind Gust: 28 Km/h
Clouds: 99%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:27 pm
Translate »
error: Content is protected !!