नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापुरात गांजा सेवन करून कोयत्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न तरुण पोलिसांच्या ताब्यात

🚨 दर्शन पोलीस टाइम 🚨

प्रतिनिधी – संजय दिंडे

कोल्हापूर :- सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करून हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत ताब्यात घेतले. साकिब फिरोज अत्तार (वय २६, रा. साळुंखे पार्क, प्लॉट नंबर १०१, कोल्हापूर) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. नेहरू नगर येथील आयसोलेशन हॉस्पिटल
समोरील मंदिराजवळ एक इसम गांजाचे सेवन करून हातात हत्यार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून संबंधित इसमाला ताब्यात घेण्यासाठी जवळ जात असताना तो पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पोलिसांनी तत्काळ घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अर्धवट जळालेली गांजाची सिगारेट आणि कोयता आढळून आला. प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क) सह २७, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे, पोलीस हवालदार कृष्णात पाटील, पोलीस नाईक मिलिंद नांगर, पोलीस कॉन्स्टेबल सूरज भोपळे आणि राहुल कदम यांनी सहभाग घेतला.
पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिलीप पाटील पुढील तपास करीत आहेत. सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करून किंवा हत्यारे बाळगून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून, अशा प्रकारांची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:27 am, November 20, 2026
19°C
साफ आकाश
32 %
4 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 7%
Visibility: 10 km
Sunrise: 6:44 am
Sunset: 5:49 pm
Translate »
error: Content is protected !!