नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा मंगळवार पासून बेमुदत संप.


चंदगड न्यायालयातील कामकाज ठप्प.
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी : प्रा नागेंद्र जाधव.

कोल्हापूर :- वेतनवाढीचा प्रस्ताव
रखडल्याने राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (१७ नोव्हेंबर) बेमुदत संप पुकारला आहे. या संपात राज्यातील ३५ हजार न्यायालयीन कर्मचारी सहभागी होणार आहेत. संपामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
‘वेतनवाढीचा प्रस्ताव २२
महिन्यांपासून रखडला आहे. यापूर्वी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी काळ्या फिती लावून सरकारचे लक्ष वेधले होते, तसेच सामूहिक रजा आंदोलन केले होते. न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार न झाल्याने महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट क) संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे’, अशी माहिती पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश आलमलेआणि सचिव गोरक्षनाथ गोफणे यांनी दिली.
‘न्यायालयात अपुरे मनुष्यबळ, न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांची वाढती  संख्या, कामाचे स्वरुप विचार घेता वेतनात तफावत आहे. वेतनवाढीचा प्रस्ताव गेल्या २२ महिन्यांपासून प्रलंबित आहे. वेतनवाढीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरू ठेवणार आहोत’, असे त्यांनी नमूद केले.
‘दिवाळीच्या सुट्टीनंतर न्यायालयीन कामकाज सुरू झाले. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने पक्षकारांसह वकिलांची गैरसोय होणार आहे. नवीन दावे दाखल करणे, अर्ज नोंदणी, आदेशांची प्रमाणित प्रत मिळविणे, जामीन आदेशांच्या अंमलबजावणीत अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे शासनाने त्वरीत दखल घेऊन न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी न्यायालयीन कर्मचारी, वकीलवर्ग, व सामान्य जनतेतून होत आहे.
चंदगड न्यायालयातील कामकाजही मंगळवार पासून बेमुदत बंद असून तेथील कर्मचारीही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. न्यायमंदिरातील कर्मचाऱ्यांनाच सरकारपुढे न्याय मागण्यासाठी आंदोलन हाती घ्यावे लागणे ही खरं तर दुर्दैवी बाब असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी चंदगड न्यायालयीन कर्मचारी अध्यक्ष राहुल घोडके, अरविंद लोंढे, संदीप गंगाधर, संजय वीर, अमित रेडेकर, परीक्षेत पवार, फारुख कागवडे, चेतन चोपडे, प्रशांत मेटकुपी, कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील, प्रवीण कागदे, राघवेंद्र नाईक, विकास भोपळे, केतन चोपडे, प्रशांत वाडकर, रामा वाडकर, अश्विन पानारी सह 23 कर्मचारी क्लर्क, शिपाई, बेलीफ स्टेनो कर्मचारी यांनी या आंदोलनास आपला पाठींबा देऊन आपला सहभाग नोंदवला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:13 am, November 19, 2026
23°C
साफ आकाश
40 %
7 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:43 am
Sunset: 5:49 pm
Translate »
error: Content is protected !!