नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

देवळी शहरात संत संताजी जगनाडे सभागृह उभारणार; शासनाकडून पाच कोटींचा निधी मंजूर


देवळी (प्रतिनिधी: गजानन पोटदुखे), दि. १८ नोव्हेंबर २०२६:
देवळी शहरात तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे भव्य समाज मंदिर व सभागृह उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना (सन २०२६-२७)’ अंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, सभागृहासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे.
या सभागृहाच्या उभारणीसाठी वर्धा रोडवरील अग्रवाल लेआउटमधील विशिष्ट जागा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सभागृहाच्या निर्मितीसाठी देवळी शहरातील स्थानिक राजकीय नेत्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले असून शासनाने भरीव निधी मंजूर केला आहे.
या सभागृहामुळे समाजाच्या विविध सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी एक हक्काचे आणि सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे देवळी शहरातील नागरिक आणि समाज बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:13 am, November 19, 2026
23°C
साफ आकाश
40 %
7 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:43 am
Sunset: 5:49 pm
Translate »
error: Content is protected !!