🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
इचलकरंजी ,शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका सराईत मोटारसायकल चोराला बेड्या ठोकून त्याच्याकडून तब्बल १६ मोपेड्स (४ सुझुकी बर्गमन व १२ होंडा अॅक्टिव्हा) असा एकूण ४,२०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे इचलकरंजीसह परिसरात दुचाकी चोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना, पोलीस अंमलदार सदाम सनदी व तुषार सूर्यवंशी यांना तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांमार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रदीप बाळू मस्के (वय २४ वर्षे, रा. शिवाजी चौक, तरदाळ, ता. हातकणंगले) यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गु.र.नं. ८९७/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२) मधील गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, त्याने आणखीन बरीच मोपेड्स चोरी केल्याचे मान्य करत, ती चोरीची वाहने गहाणवट ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून त्याच्याकडून एकूण १६ मोपेड्स हस्तगत केल्या आहेत.
कुठले गुन्हे झाले उघड?
या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमधील तब्बल १४ गुन्हे उघडकीस आले असून, उर्वरित २ मोपेड्सच्या चोरीबाबत अधिक तपास सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांचा समावेश आहे:
शिवाजीनगर पोलीस ठाणे: गु.र.नं. ८९७/२०२६, ४५२/२०२६, ८५१/२०२६, ७८७/२०२६, ८५१/२०२६, ४७०/२०२६, ६६७/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे).
इचलकरंजी पोलीस ठाणे: गु.र.नं. ३४४/२०२६, ३१९/२०२६, २५१/२०२६, १७२/२०२६, ३०५/२०२६.
शहापूर पोलीस ठाणे: गु.र.नं. ५३०/२०२६.
शाहूपुरी पोलीस ठाणे: गु.र.नं. ८५७/२०२६.
पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी:
सदरची धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आणासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक शरद मेमाने, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, सहा. फौजदार अनिल चव्हाण, पो.हे.कॉ. किशोर सूर्यवंशी, वसंत घुगे, विकास चौगुले, सदाम सनदी, गणेश सनदी, स्वप्निल मिसाळ, प्रमोद चव्हाण, तुषार सूर्यवंशी, राहुल कामत, शिरीष कांबळे आणि कुणाल घाटगे यांच्या पथकाने पार पाडली आहे.



