नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

नाशिकमध्ये निवृत्त सहाय्यक आरटीओ हेमंत हेमाडे यांची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨

प्रतिनिधी योगेश गवळे


नाशिक: नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल परिसरात राहत्या घरात निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन (आरटीओ) अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
प्राथमिक माहितीनुसार, घरातून गोळीबाराचा आवाज आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. 
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्राथमिक अंदाजानुसार कौटुंबिक कारणातून हे पाऊल उचलले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट किंवा अन्य महत्त्वाचा पुरावा आढळला की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्या पोलीस विविध अंगांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. 

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:09 am, November 21, 2026
19°C
साफ आकाश
35 %
6 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:44 am
Sunset: 5:48 pm
Translate »
error: Content is protected !!