🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी राजेंद्र पवार
मिरज : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा _मोठ्या आवाजात डॉल्बी साऊंड सिस्टीम वाजवून सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई 22 सप्टेंबर 2026 रोजी रात्री नागोबा_ कट्टा, मिरज येथे करण्यात आली.मिरज शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक 362/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 व 292 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी मुरलीधर गणेश उत्सव मंडळ, ब्राह्मणपुरी, मिरज यांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टीमचा वापर करण्यात आला. या साऊंड सिस्टीमच्या आवाजाची सरासरी पातळी 120.9 डेसिबल इतकी नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.पोलिसांनी डॉल्बीचा आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्यानंतरही संबंधितांनी आवाज कमी केला नसल्याचा आरोप आहे. तसेच विसर्जन मिरवणूक सार्वजनिक रस्त्यावर थांबवून मोठ्या आवाजात नाचत असल्याने वाहतूक व नागरिकांना अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.मिरवणूक पुढे घेऊन जाण्याबाबत पोलिसांनी सूचना दिल्यानंतरही आरोपींनी मिरवणूक पुढे नेण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. पोलिस विभागाकडून देण्यात आलेल्या तोंडी व लेखी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी सुनिल धोंडीराम इंगोले (35, खोतनगर, मिरज), निशांत शिवाप्पा म्हेत्रे (38), विशाल मारुती गवळी (40), ओंकार राजू रजपूत (30), शिवराज प्रकाश पाटील (35, सर्व रा. हिरेमठ गल्ली, मिरज) आणि डॉल्बी साऊंड मालक प्रशांत मदन बराडे (45, रा. समर्थनगर, बेळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मसपोनि शिंदे करीत आहेत. दाखल गुन्ह्याची प्रथम खबर संबंधित न्यायालयाकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.



