नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राधानगरीत वृध्द महिलेचा निर्घृण खुन. दोनआरोपी जेरबंद

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी- प्रा. नागेंद्र जाधव

कोल्हापूर:- राधानगरी तालुक्यातील पनोरी गावातील घरी एकटीच राहणारी वृध्द महिला श्रीमंती हरी रेवडेकर वय ७३ या दि. ०७/०९/२०२५ घरामध्ये आढळून आल्या नाहीत म्हणून आजूबाजूच्या लोकांनी तिचा शोध घेतला असताना तिचे प्रेत गोबरगॅसमध्ये मिळुन आल्याची घटना तपासाअंती उघडकीस आली. सदर प्रेताची पहाणी केली असता, मयतेच्या डोक्यात मारहाणीची जखम दिसून आली. यावरुन अज्ञात व्यक्तीनी कोणत्यातरी कारणास्तव तिचा खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत गोबरगॅसमध्ये टाकून दिल्याचे निष्पन्न झाले.
त्याबाबत तिचा दत्तक मुलगा अमित हरी रेवडेकर याने राधानगरी पोलीस ठाण्यास दिलेल्या फिर्यादी वरून राधानगरी पोलीस ठाणेत गुन्हा रजि न.२५९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), २३८,३११, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदर घडलेल्या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, योगश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री रविंद्र कळमकर यांना समांतर तपास करुन सदरचा गुन्हा लवकर उघडकीस आणणे करीता सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक, सागर वाघ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीसअमंलदार यांचे पथकासह सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. सदरचा गुन्हा घडलेल्या ठिकाणाची व तेथील वस्तुस्थितीची पाहणी करुन, सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्याचे समवेत असलेल्या पोलीस अमंलदार सुरेश पाटील, रुपेश माने, विनोंद कांबळे, राम कोळी, रोहित मर्दाने यांच्या पथकाने शोध सुरु केला. व सदरचा गुन्हा हा रात्रौ १०.०० वा. ते १२.०० वा. च्या दरम्यान घडल्याचे स्पष्ट झाले.
खुनाच्या दिवशी पनोरी गावामध्ये “ग्रामीण युवा शक्ती संघटना” व “पनोरीचा राजा” या दोन गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरु होती. त्या दरम्यान गावातील नागरिक मिरवणूक पाहण्यास गेलेले होते. सदरचा गुन्हा उघडकीस आणणे करीता कोणतेही पुरावे अथवा उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती. त्यामुळे तपास कार्य करणे अवघड व आव्हानात्मक होते. वेगवेगळी पथके तयार करुन जे लोक मिरवणूकीमध्ये गेलेले होते व ज्या लोकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग नव्हता अशा लोकांचा आढावा घेतला असता परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज, त्याचप्रमाणे गोपनीय बातमीदार यांचेकडील गुन्हयाच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीमध्ये एकंदरीत आरोपी १) अभिजीत मारुती पाटील, २) कपिल भगवान पातले ता. राधानगरी जिल्हा कोल्हापूर हे मिरवणुकीमधून मध्येच बाहेर गेलेले होते तसेच सदरचा गुन्हा घडल्यापासून आजूबाजूच्या परिसरामध्ये ते फिरत होते तसेच त्यांच्या दैनंदिन वागण्यामध्ये थोडा बदल झालेला झाल्याचे आढळून आले. म्हणून त्यांची माहिती घेऊन चौकशी केली असता ते एका आर्थिक अडचणीमध्ये असल्याचे समजून आले. याच संशयाच्या अनुषंगाने त्यांना स्थानिक गुन्हें अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेवून कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यानी सदरचा खुन आपण केल्याची कबुली दिली.
अधिक तपासांती ते दोघेही बालपणीचे मित्र असून ते दोघेही आर्थिक अडचणीत असल्याने त्यां दोघांना पैशाची नितांत गरज होती. म्हणून त्यांनी नमुद वृध्द महिला ही घरामध्ये एकटीच राहत होती व तिच्या अंगावर भरपूर दागिणे होते याची पुर्ण माहिती घेवून तिच्या अंगावरील दागिणे लुटण्याचा, गेल्या एक महिन्यापुर्वी कट रचल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी अनंत चतुर्थीचा दिवस निवडला होता. गावामध्ये सार्वजनिक गणेश विर्सजन सुरु असताना गावातील नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी बाहेर असताना सदरची महिला एकटीच घरी असल्याची संधी साधून दि. ०६/०९/२०२५ रोजी रात्री नमूद वृध्द महिलेच्या घरामध्ये मागील दरवाजाने प्रवेश करुन सदर महिलेचे तोंड दाबून, तिचे अंगावरील दागिणे लुटत असताना तिने प्रतिकार केला म्हणून सदर महिलेच्या डोक्यात मारहाण करुन तिचा खुन केला. तसेच तीचे दागीने काढुन घेवून,पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत साडीमध्ये गुंडाळून विजय शंकर बरगे यांच्या घरामागील गोबर गॅसमध्ये टाकुन दिल्याची त्यांनी कबुली दिली आहे. नमुद आरोपी यांना राधानगरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री संतोष गोरे करीत आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक संतोष गोरे राधानगरी पोलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अमंलदार सुरेश पाटील, रुपेश माने, राम कोळी, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, संजय देसाई, अमित सर्जे, राजु कांबळे, विजय इंगळे, राजेंद्र वरांडेकर, हंबिर अतिग्रे, प्रदिप पाटील तसेच राधानगरी पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पोवार मँडम, भोसले, पोलीस अमंलदार पिंटु खामकर, शेळके, सुदर्शन पाटील, कोळी, रघु पोवार, देसाई, यांनी पार पाडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:31 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
20 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!