🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर :- इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. तारदाळ (ता. हातकणंगले) येथील हनुमान नगर परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत रोख व मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण २,०७,३४0 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एका हद्दपार गुन्हेगाराचाही समावेश आहे.
दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७:५० वाजण्याच्या सुमारास तारदाळ गावच्या हद्दीतील हनुमान नगर येथील शिवराज बबन दौंड यांच्या घरी हा छापा टाकण्यात आला. पोलीस हवालदार सतीश कुंभार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात मिळून ३ पानी पत्त्यांच्या पानावर छक्के-पंजेचे पैसे लावून जुगाराचा खेळ खेळत व खेळवत होते. या कारवाईत पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे:
रोख रक्कम: ३५,३४0 रुपये
मोबाईल हँडसेट्स: ७ मोबाईल (किंमत अंदाजे ७२,००० रुपये)
होंडा युनिकॉर्न मोटारसायकल: १ (किंमत १,००,००० रुपये)
एकूण मुद्देमाल: २,०७,३४0 रुपये
जप्त केलेले आरोपी:
या प्रकरणी पोलिसांनी खालील ५ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४, ५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे:
१. शिवराज बबन दौंड (वय ३२ वर्षे, रा. हनुमान नगर, तारदाळ, ता. हातकणंगले)
२. सुनील मारुती वडर (वय २८ वर्षे, रा. केटकाळे नगर, कबनूर, ता. हातकणंगले)
३. कासीम शिराज अरब (वय ३४ वर्षे, रा. दत्तनगर, गल्ली नं. १०, शाहपूर, ता. हातकणंगले)
४. प्रमोद भैरू वेटाळे (वय ४५ वर्षे, रा. दत्तनगर, गल्ली नं. ४, शाहपूर, ता. हातकणंगले)
५. प्रकाश गोविंद आडके (वय ३४ वर्षे, रा. समर्थ नगर, तारदाळ, ता. हातकणंगले)
विशेष बाब – हद्दपार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात:
या कारवाईदरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे, आरोपी क्रमांक ५ (प्रकाश गोविंद आडके) हा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. विशेष म्हणजे, त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. असे आदेश असतानाही तो हद्दपार क्षेत्रात येऊन जुगार खेळताना मिळून आल्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा आणखी तीव्र करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा. फौजदार मुंगसे करीत आहेत.



