नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

उंभर्टीत बिबट्याचा धुमाकूळ! शेतात बंदिस्त शेडमध्ये घुसून ३ ते ४ शेळ्यांचा केला फडशा


पिंपळनेर वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची आक्रमक मागणी
शेतकरी सुरेश भदाणे यांचे मोठे आर्थिक नुकसान; पंचनामा करून तातडीने भरपाई देण्याची मागणी

🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨

प्रतिनिधी अकिल शहा


साक्री : साक्री तालुक्यातील उंभर्टी परिसरात बिबट्याचा उच्छाद वाढला असून, रात्रीच्या सुमारास बंदिस्त शेडमध्ये घुसून बिबट्याने ३ ते ४ शेळ्यांचा फडशा पाडला आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळनेर वनविभागास या बिबट्याला पकडण्यात अपयश येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार, २४-२५ ऑक्टोबरच्या रात्री उंभर्टी येथील शेतकरी सुरेश बळीराम भदाणे यांच्या शेतातील बंदिस्त शेडमध्ये अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ३ ते ४ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, यामुळे सुरेश भदाणे यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच दिघावे परिमंडळाचे वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
१. तात्काळ पिंजरा लावावा: परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याला वनविभागाने तातडीने पिंजरा लावून जेरबंद करावे.
२. आर्थिक नुकसान भरपाई: शेतकऱ्याचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन, वनविभागाने तात्काळ पंचनाम्याचा अहवाल सादर करून हानी भरपाईची रक्कम तातडीने संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करावी.
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरण असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने त्वरित ठोस उपाययोजना करावी, अशी आर्त हाक उंभर्टी येथील ग्रामस्थांनी दिली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:24 pm, October 27, 2026
34°C
साफ आकाश
21 %
18 Km/h
Wind Gust: 25 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:30 am
Sunset: 5:58 pm
Translate »
error: Content is protected !!