नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अक्कलकुवा येथे अवैध गुटखा विक्रेत्या इसमावर गुन्हे शाखेची धडक कारवाई

⭐१ लाख ३२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️ प्रतिनिधी :- प्रविण चव्हाण

नंदुरबार : अक्कलकुवा येथील शिवनेरी चौकात अवैध गुटखा साठवून विक्री करणाऱ्या एका इसमाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून तब्बल १ लाख ३२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ११ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुरज राजेश परदेशी (वय २८, रा. शिवनेरी चौक, अक्कलकुवा) हा आपल्या घरात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा साठवून विक्री करीत आहे. माहितीची खातरजमा करून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अक्कलकुवा पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.
छापा टाकल्यावर परदेशी यांच्या घरात पांढऱ्या गोण्या आढळून आल्या. त्यांची तपासणी केली असता विविध प्रकारचा गुटखा व तंबाखू असा एकूण १,३२,६५० रुपयांचा अवैध मुद्देमाल मिळून आला.
या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८१४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३, २२३, २७५ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(iv), ३०(२)(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि. मुकेश पवार, पोहेकॉ. महेंद्र नगराळे, दादाभाई मासळ, पोना. चेतन साळवे व नितीन गांगर्डे यांनी केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:56 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!