नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

भू-अभिलेख कार्यालयात १ हजारांची लाच मागणी! अँटी करप्शन ब्युरोची मोठी कारवाई

DPT NEWS 🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- नारायण कांबळे

कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका येथील भूमी अभिलेख कार्यालयात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय दस्तरबंद वर्ग-३ पदावरील लोकसेवक शिवराम कृष्णा कोरवी रा. हुपरी ता. हातकणंगले याने शेतजमिनीचे आवश्यक असलेल्या शेजारील गट नकाशाच्या प्रती देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
तक्रारदार हे आपल्या शेतजमीनीचे शेजारील गट नंबरचा फळणी नकाशाची प्रत घेण्यासाठी कागल भूमी अभिलेख कार्यालयात कागल गेले असता, संबंधित कामासाठी आरोपी अधिकाऱ्याने १ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने कोल्हापूर येथील अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत पडताळणी केली असता लाच मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.
संबंधित प्रकरणात लोकसेवक शिवराम कृष्णा कोरवी (रा.हुपरी ता. हातकणंगले) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कागल पोलीस ठाणे येथे सुरू आहे.
ही कारवाई पुणे अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शासकीय कार्यालयात नागरिकांच्या कामासाठी खुलेआम लाच मागण्याचे प्रकार अजूनही सुरू असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.अँटी करप्शन ब्युरोने केलेली ही कारवाई भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी इशारा मानली जात आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:46 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!