नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरजेतील उद्योजक अॅड. सी. आर. सांगलीकर अटकेत

२७ कोटींच्या बेकायदा जमीन विक्रीप्रकरणी धडक कारवाई
५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी; महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खळबळ

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : राजेंद्र पवार

मिरज :- २७ कोटी रुपयांच्या बेकायदा जमीन विक्रीप्रकरणी मिरजेतील उद्योजक व राजकीय कार्यकर्ते अॅड. सी. आर. सांगलीकर यांना पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सोमवारी रात्री मिरज येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, सुमारे ३३ एकर जमीन बेकायदेशीररीत्या विक्री करून २७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप सांगलीकर यांच्यासह इतर चौघांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पांडुरंग पवार यांनी १८ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती.
तपासात सदर जमीन ही पीएसीएल कंपनी व सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीच्या ताब्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. असे असतानाही ही जमीन तृतीय पक्षाला विकून गुंतवणूकदारांची तसेच शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखा करत असून, आणखी महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अॅड. सी. आर. सांगलीकर यांनी २०१४ मध्ये मिरज विधानसभा निवडणूक लढवली होती. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अटक झाल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील चौकशीदरम्यान अनेक धागेदोरे उलगडण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तपासाची पुढील दिशा निर्णायक ठरणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!