नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

डाक विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा ‘महाराणी ताराबाई सभागृहात’ गौरव

DPT NEWS🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी- विकी माने

कोल्हापूर:- भारतीय डाक विभागाच्या कोल्हापूर विभागामार्फत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृह येथे उत्साहात पार पडला. कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर मा. वैभव वाघमारे यांच्या हस्ते या यशस्वी कर्मचाऱ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.ऑगस्ट २०२५ मध्ये राबविण्यात आलेली ‘मिशन क्रांती ३.०’ आणि ७ ऑक्टोबर २०२५ रोजीची ‘वित्तीय सशक्तिकरण’ ही विशेष मोहीम या दरम्यान टपाल आयुर्विमा (PLI) आणि ग्रामीण टपाल आयुर्विमा (RPLI) क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विक्रमी कामगिरी केली होती. या कष्टाची दखल घेत विभागातर्फे विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मण हिंदुराव पोवार (पोस्टमन, गुळ मार्केट यार्ड, कोल्हापूर),विनोद कुडाळकर (गुळ मार्केट यार्ड, कोल्हापूर) शिवाजी कोळी (पोस्टमन, गुळ मार्केट यार्ड, कोल्हापूर),यासीन पिंजारी (बीपीएम, वाठार तर्फे वडगाव), प्रकाश शेलार (बीपीएम, वडणगे बीओ, आंबेवाडीएसओ),मुंतजार मुजावर (एसपीएम, सरूड एसओ) यांनी केलेल्या विशेष योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.यावेळी प्रवर अधीक्षक वैभव वाघमारे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. सर्वसामान्यांपर्यंत टपाल विभागाच्या विमा योजना प्रभावीपणे पोहोचवल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी व पुरस्कार विजेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:00 pm, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!