नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

सांगलीतील गांजा विक्रेत्याला कोल्हापूर LCB चा दणका; 1.82 लाखांचा मुद्देमाल जप्त

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨✍️🗞️📰प्रतिनिधी- नारायण कांबळे

कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी मोठी कारवाई करत सांगली जिल्ह्यातील गांजा विक्री करणाऱ्या इसमाला अटक केली आहे. या कारवाईत गांजासह एकूण 1,82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता . यांच्या आदेशानुसार एलसीबी कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व अमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चिपरी फाटा, जयसिंगपूर परिसरात सापळा रचण्यात आला.
पथकाने संशयिताचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव वैभव राजाराम आवळे (वय 26, धंदा – मजुरी, रा. हडको कॉलनी, 100 फूट रोड, मिरज जि. सांगली) असे सांगितले. त्याच्या ताब्यातून 05 किलो गांजा, एक मोबाईल हँडसेट व गांजा विक्रीसाठी वापरलेली दुचाकी स्कूटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त केलेला गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, सदर आरोपी हा सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खूनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म्स अ‍ॅक्टसह एकूण 8 गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार अपर पोलीस अधीक्षक , आप्पासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत एलसीबीचे अधिकारी व अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात पोलिसांचा कडक इशारा – कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:46 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
21 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!