नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क कडून बनावट मद्य निर्मिती रॅकेट उघड, आरोपींना दोन दिवसाची कोठडी

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – सचिन देसाई

इचलकरंजी:- राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या

बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्क, शाहूवाडी पथकाने बोरपाडळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या गावचे हददीत कोल्हापुर-आंबा या मार्गावर दशरथ जालिंदर कुंभार व.व.29 मुळ रा. माळवाडी भेंडवडे ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. सध्या रा.निळे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर हा एक होंडा कंपनीची ऐक्टिव्हा दुचाकी वाहन तिचा रजि क्र. MH-09-DW-49 पांढरा रंग या दुचाकी वाहनावरून भेसळयुक्त् बनावट विदेशी मद्याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळालेवर अधिकारी यांनी त्याठिकाणी वाहन तपासणी केली असता त्यामध्ये एका प्लॅस्टिक बारदानामध्ये भेसळयुक्त् बनावट विदेशी मद्याचे एकुण 180 मिलीचे 3 बॉक्स् त्यामध्ये (रॉयल स्टॅग व्हिस्की व मॅकडॉल नं.1 व्हिस्की) असा मुददेमाल मिळून आला. भेसळयुक्त् बनावट विदेशी मद्य त्याने कोठून व कोणाकडून आणले याबाबत चौकशी केली असता त्याने जयदिप रघुनाथ कांबळे व.व.36 रा. समाज मदिर परिसर, मौजे तासगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर याचेकडून आणले असे सांगितले. त्यावरून निळे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर येथे जावून भेसळयुक्त् बनावट मद्याचे एकुण 180 मिलीचे 3 बॉक्स् (रॉयल स्टॅग व्हिस्की व मॅकडॉल नं.1 व्हिस्की) तसेच एक हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी वाहन तिचा रजि. क्र.MH-09-DB-7496 काळा रंग व गुन्हयात भेसळयुक्त् बनावट मद्याचे 180 मिलीचे 6 बॉक्स् (रॉयल स्टॅग व्हिस्की व मॅकडॉल नं.1 व्हिस्की) व दोन दुचाकी वाहने (1,40,000/-) असा एकुण रू. 2,28,080/- इतक्या रक्कमेचा मुददेमाल जप्त करणेत आला असून आरोपी दशरथ जालिंदर कुंभार, जयदिप रघुनाथ कांबळे यांना अटक करणेत आली आहे. त्यांचेवरती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (a),(b), (d), (e), (1), 81, 83, 90, व 103 प्रमाणे तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123 अन्वये गुन्हा रजि क्र.03/2026. दि.06/01/2026 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना के. डी. काकटकर मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पन्हाळा यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. सदर गुन्ह्याबाबत राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे, उप-अधीक्षक, युवराज शिंदे यांचे मागदर्शनाखाली
निरीक्षक के. बी. बिरादार हे तपास करीत आहेत. सदर कारवाईत व्ही. आर. शिताळे, श्रीमती आर.डी. गोसावी, श्रीमती एस. आर. गायकवाड, दुय्यम निरीक्षक, एस.आर.ठोंबरे, स.दु.नि., के.एम. पाटील, ए.ए. कारंडे जवान, जे.आर. शिनगारे जवान, नि-वाहन चालक, एम.डी. पाटील, एम.बी. पोवार जवान यांनी मदत केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!