DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अकिल शहा
साक्री: निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील पेटले गावाचे पुढे जामदा गावाच्या शिवारात दिनांक ०४/०१/२०२६ रोजी दुपारी ०२.०० वाजेच्या सुमारास सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. ली. कंपनीचे टॉवरच्या जवळ स्वस्त दरात स्क्रॅप घेणेसाठी बोलावुन फिर्यादीस हाताबुक्यांनी व त्यांच्या जवळील लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांचेकडुन ५९,०००/- रुपये लुटले म्हणुन त्यावरुन निजामपुर पोलीस स्टेशन येथे गुरनं ००१/२०२६ बीएनएस कलम ३१०(२), ११५(२), ३५२,३५१ (२) प्रमाणे दि. ०४/०१/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने सपोनि/मयुर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय व तांत्रीक माहितीच्या आधारे तपासावरुन नमुद गुन्हयातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सराईत दरोडेखोर आरोपी नामे १) प्रभु बालीश पवार वय-२९ वर्षे, २) जयेश राजा पवार वय-२८ वर्षे रा. जामदा ता. साक्री जि.धुळे या दोघांना निजामपुर पोलीस स्टेशनचे पोहेकों/मनोज देवरे, पोकों/सुजीत देवरे, पोकों/सागर थाटशिंगारे, पोकों/सागर कांगणे यांनी पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन ते सद्या पोलीस कोठडी रिमांडमधे आहे. सदर आरोपीताकडुन तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची युनीकॉर्न मो. सा. तसेच मोबाईल असा एकुण ०१,८५,०००/- रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील इतर आरोपीतांचा शोध सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक, धुळे, मा. डॉ. अजय देवरे, अपर पोलीस अधिक्षक, धुळे, मा. एस. आर. बांबळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, साक्री, यांचे मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी सपोनि/ मयुर भामरे, सपोनि/प्रियदर्शनी थोरात, पोउपनि/यशवंत भामरे, पोउनि/मधुकर सोमासे, असई/कलीम शेख, पोहेकों/नारायण माळचे, पोहेकों/रतन मोरे, पोहेकों/नागेश्वर सोनवणे, पोहेकॉ/प्रदिप आखाडे, पोना/खंडेराव पवार, पोकों/सुजीत देवरे, पोकों/सागर थाटसिंगारे, पोकों/दिपक महाले, पोकॉ राकेश महाले, पोकों/गौतम अहिरे, पोकों/मुकेश दुरगुडे, पोकॉ/पृथ्वीराज शिंदे, राकेश बोरसे, पोकों/सागर कांगणे, पोकों/अर्जुन पवार, पोकों/कृष्णा भिल, पोकों/परमेश्वर चव्हाण, पोकों/सुनिल अहिरे, पोकों/अर्जुन पवार, पोकों/टिलु पावरा, पोकों/श्रीराम पदमर, चापोकों/मोहन माळी यांनी केली आहे.



