नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पिंपळनेर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली; योगेश नेरकर विजयी

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी : साकिब सय्यद

पिंपळनेर :- पिंपळनेर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची तसेच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया आज शांततेत पार पडली. ही निवड प्रक्रिया पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष व गटनेत्या डॉ. सौ. योगिता जितेश चौरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
उपनगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे योगेश सोमनाथ नेरकर यांनी, तर शिवसेना शिंदे गटातर्फे विजय साहेबराव गांगुर्डे यांनी नामांकन दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सहकारी अधिकारी अभियंता तेजस लाडे यांनी सहकार्य केले.
झालेल्या मतदानात योगेश सोमनाथ नेरकर यांनी १० विरुद्ध ९ मतांनी विजय मिळवत पिंपळनेर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली. तसेच भारतीय जनता पक्षातर्फे स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. दयानंद (मिलिंद) कोतकर यांची निवड करण्यात आली. शिवसेना शिंदे गटातर्फे स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेचे तालुका विधानसभा प्रमुख संभाजीराव शिवाजीराव अहिरराव यांची निवड झाली.
निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने, उपाध्यक्ष चंद्रजीत भामरे तसेच साक्री व पिंपळनेर येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, निवड प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी पिंपळनेर नगर परिषदेच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे तसेच निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. निवड प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:33 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!