नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पिंपळनेर मुस्लिम युवा मंचतर्फे कब्रस्तानाची स्वच्छता; तरुणांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी: साकिब सय्यद

पिंपळनेर:- येथील मुस्लिम युवा मंच पिंपळनेरच्या वतीने बुधवारी (दि. ७ जानेवारी) मुस्लिम समाज कब्रस्तान परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तरुणांनी एकजुटीने दिवसभर श्रमदान करून संपूर्ण परिसराचा कायापालट केल्याने परिसरातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.
गेल्या पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे कब्रस्तान परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत, झाडे-झुडुपे आणि कचरा साचला होता.यामुळे या ठिकाणी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन मुस्लिम युवा मंचच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी सकाळपासूनच मुस्लिम युवा मंचचे सर्व सदस्य हातात स्वच्छतेची साधने घेऊन कब्रस्तानात दाखल झाले.सर्वांनी मिळून परिसरातील वाढलेले गवत कापले,झाडे-झुडुपे हटवली आणि साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली.दिवसभर चाललेल्या या अथक परिश्रमानंतर संपूर्ण कब्रस्तान परिसर आता स्वच्छ आणि नीटनेटका दिसत आहे.
या मोहिमेमध्ये मुस्लिम युवा मंच पिंपळनेरचे सर्व सदस्य उत्साहाने सहभागी झाले होते. केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीतून समाजसेवा कशी करावी,याचा आदर्श या तरुणांनी घालून दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पिंपळनेर शहर व परिसरातील नागरिकांनी या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!