नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

शेलबारी घाटात राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई

७१.७३ लाखांचा विदेशी मद्यसाठा व ३ वाहने जप्त; चालक फरार..

DPT NEWS🗞️📰✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी साकिब सैय्यद

धुळे:- परराज्यातून होणाऱ्या मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत शेलबारी घाट (ता. साक्री, जि. धुळे) येथे तब्बल ७१ लाख ७३ हजार ८६४ रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा व तीन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे अवैध मद्य वाहतुकीच्या साखळीत मोठा धक्का बसला आहे.
गुप्त माहितीवरून कारवाई
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त मा. डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) मा. प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त मा. यु. आर. वर्मा (नाशिक विभाग) तसेच अधीक्षक श्रीमती स्वाती काकडे (धुळे) यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
मा. दुय्यम निरीक्षक श्री. एस. एफ. ठेंगडे (शिरपूर बिट क्र. १) यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर शेलबारी शिवारात गुप्त पाळत ठेवण्यात आली होती.
तीन वाहने अडवली, चालक फरार
नाशिक जिल्ह्यातून पिंपळनेरच्या दिशेने येणारी
टोयोटा कंपनीची दोन वाहने – MH-14-HG-9992, GJ-26-AE-2869
किया कंपनीचे एक वाहन – MH-46-CH-0929
पथकाने थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर चालकांनी वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून अंधाराचा फायदा घेत पलायन केले.
एवढा मुद्देमाल जप्त
तपासणीदरम्यान खालील मुद्देमाल आढळून आला—
₹14,73,864 – रॉयल स्टँग, रॉयल स्पेशल, ब्लेंडर प्राईड, मॅजिक मुमेंट्ससह विविध ब्रँडचे विदेशी मद्य व बियर
₹57,00,000 – तीन वाहने (२ टोयोटा + १ किया)
➡️ एकूण जप्त मुद्देमाल : ₹71,73,864
गुन्हा दाखल; तपास सुरू
फरार वाहनचालक व वाहनमालकांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ, ई), 81, 83 व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक डी. पी. नेहूल, निरीक्षक आर. आर. धनवटे, दुय्यम निरीक्षक डी. एस. पाटील तसेच जवान अमोल धनगर, के. एम. गोसावी, हेमंत पाटील व सुरेश शिरसाळे यांच्या पथकाने केली. गुन्ह्याची फिर्याद जवान अमोल धनगर यांनी दिली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे करीत आहेत.
अवैध मद्याबाबत माहिती द्या – आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीबाबत माहिती असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा—
📞 टोल फ्री: 1800 233 9999
📱 WhatsApp: 8422001133
☎️ दूरध्वनी: 02562-2297484

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:32 pm, February 26, 2026
32°C
साफ आकाश
20 %
8 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!