नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळ्यात चार पोलीस कर्मचारी लाचखोरीत अटकेत

₹२ लाख लाच स्वीकारताना ACBची रंगेहाथ कारवाई

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी कैलास माळी

धुळे:- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलीस स्टेशनअंतर्गत येणारे थाळनेर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार यांच्या वडिलांना गुन्ह्यात अटक नकरता मदत करण्यासाठी ₹३ लाखांची मागणी करून तडजोडीअंती ₹२ लाख स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस हवालदार भुषण रामोडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल धनराज माळवे, किरण सोनवणे व मुकेश पावरा यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदारावरील गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी व प्रकरणात सहकार्य करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने ACB धुळे येथे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला. दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी पंचांसमक्ष ₹२,००,०००/- रुपये स्वीकारताना कॉन्स्टेबल मुकेश पावरा याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर अन्य आरोपींनाही अटक करण्यात आली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!