नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मोठी ब्रेकिंग | पोलिस बंदोबस्तातच पैसे वाटप? आमदार इद्रिस नायकवडींवर गंभीर आरोप

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨मिरज प्रतिनिधी : राजेंद्र पवार

मिरज:- मिरज शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक तापत चालले असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आज सोमवारी दुपारी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या निवासस्थानाजवळ संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
निवासस्थानाजवळ मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते अभिजीत हारगे यांनी तेथे जाऊन पाहणी केली. यावेळी पैसे वाटप सुरू असल्याचा प्रकार प्रत्यक्ष दिसून आल्याचा दावा अभिजीत हारगे यांनी केला. या गंभीर प्रकाराची माहिती त्यांनी तात्काळ निवडणूक आयोगाच्या फिरत्या सर्वेक्षण पथकाला व पोलीस प्रशासनाला दिली.
या तक्रारीनंतर संतापजनक घटना घडली. आमदार नायकवडी यांचे कार्यकर्ते तसेच श्वेतपद्म कांबळे यांचे समर्थक आणि कथित अंगरक्षकांनी अभिजीत हारगे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याचा आरोप आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत हारगे यांनी थेट आरोप करत म्हटले की, “आमदार इद्रिस नायकवडी, त्यांचे कार्यकर्ते आणि अंगरक्षक माझ्यावर हल्ला करण्यासाठी धावून आले.”
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस बंदोबस्त असतानाच पैसे वाटप सुरू होते, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाचा कर्मचारी किंवा प्रशासनाकडून कोणतेही व्हिडिओ अथवा ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे “नेमके प्रशासन काय करत होते?” असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकारामुळे मिरज शहरातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठा आघात झाला असून, निवडणूक आयोग आता काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:09 pm, February 26, 2026
31°C
साफ आकाश
23 %
12 Km/h
Wind Gust: 14 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!