नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राज्य उत्पादन शुल्काची कोल्हापूर राजारामपुरीत मोठी कारवाई- २.७६ हजाराची बनावट दारू जप्त एक अटक.

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – आनंद कांबळे

कोल्हापूर:- कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ चे अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्काची कोल्हापूर शहरातील मातंग वसाहत, राजारामपूरी २ री गल्ली येथे परराज्य गोवा बनवाटीचे मद्य व इतर मद्यासह एकूण २,७६,७५० रूपयांचा मुददेमाल जप्त केला.कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ चे अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरच्या अधिक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे व उप-अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर शहर यांचे पथकास दि.१५/०१/२०२६ रोजी खात्रीलायक बातमी मिळाली. कोल्हापूर राजारामपुरी मातंग वसाहत २ री गल्ली येथे आरोपी विपुल पाटील याचे रहाते घरी छापा मारून गोवा राज्य निर्मितीच्या विविध बॅन्डच्या १८० मिली क्षमतेच्या १९६ सिलबंद बाटल्या, महाराष्ट्र राज्य निर्मीत विदेशी दारूच्या १८० मि.ली. क्षमतेच्या ५१९ सिलबंद बाटल्या व ७५० मि.ली. क्षमतेच्या ४२ सिलबंद बाटल्या, बिअरच्या ६५० मिली १४४ सिलबंद बाटल्या (एकूण ३१ बॉक्स) व गावठी हातभ‌ट्टी तयार दारू २८० लि. असा एकुण अंदाजे २,७६,७५० रूपये इतक्या किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.आरोपी विपुल पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई) व ९० नुसार गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.
सदर कारवाईमध्ये निरीक्षक, कोल्हापूर शहर आर.डी.वाजे, निरीक्षक, हातकणंगले महेश गायकवाड, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक, हातकणंगले शिवाजी गायकवाड व सहाय्यक दुय्यम निरीक्षक एम.आर.लाडके व जवान स्टाफ राहूल गुरव, गणेश सानप,प्रसाद पाटील, पंकज खानविलकर, सागर शिंदे, सुशांत बनसोडे व पुष्कराज शिर्के यांनी सहभाग घेतला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!