नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

विभागीय क्रीडा स्पर्धेत भाडणे येथील शासकीय निवासी शाळेच्या मुलींचे घवघवीत यश….

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री :- समाज कल्याण आयुक्तालय यांचे निर्देशानुसार शासकीय निवासी शाळेच्या विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजन नाशिक विभागातर्फे धुळे येथे करण्यात आले होते . सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नाशिक यांचे अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे यांचे द्वारा आयोजित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुले मुलींची शासकीय निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा स्पर्धा धुळे येथे पार पडल्या. माननीय श्रीमती दीपा मुधोळ मुंडे ,आयुक्त ,समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे, यांच्या प्रेरणातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कलेतून अभिव्यक्ती व क्रीडेतून आत्मविश्वास असे ब्रीदवाक्य असलेले या तरंग महोत्सवाचे उद्घाटन माननीय श्री माधव वाघ साहेब प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, नाशिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती भाग्यश्री विसपुते जिल्हाधिकारी धुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धेचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे यांनी दि. 09.01.2026 आणि 10.012026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विभागातील 10 शाळा मधील एकूण 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.
या स्पर्धेत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा भाडणे येथील मुलींनी विविध खेळांमध्ये उत्तम यश संपादन केले. यामध्ये धावणे 100 मीटर मध्ये वेदाश्री मोरे प्रथम (लहान गट), धावणे 400 मीटर उज्वला गायकवाड द्वितीय, खोखो द्वितीय (लहान गट) खो-खो द्वितीय( मोठा गट), रिले द्वितीय( मोठा गट) रस्सीखेच प्रथम( मोठा गट), थाळीफेक द्वितीय अर्चना साबळे लांब उडी प्रथम वेदाश्री मोरे , तसेच कला व भूमिका अभिनय विभागात निवासी शाळेच्या ‘बेटा बेटी एक समान’ या लोकनृत्याने द्वितीय स्थान पटकावले. सर्व स्पर्धेत एकूण 15 पारितोषिके मिळवून विभागात दुसऱ्या रँक ने जनरल चॅम्पियनशिप धुळे जिल्ह्याने मिळवली.यावेळी मा. प्रादे.आयुक्त श्री माधव वाघ साहेब, मा. सहाय्यक आयुक्त श्री संजय सैंदाणे साहेब, सर्व मान्यवरांनी सर्व विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी निवासी शाळा भाडणे तर्फे लाठीकाठी प्रात्यक्षिक तसेच एनसीसी परेड देखील करण्यात आली.
सदर स्पर्धेसाठी मुलींची खेळासाठी विशेष तयारी निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मालती सोनवणे, गृहपाल श्रीमती सोनाली महाजन, श्री सी. आर. हिरे , श्री डी.पी. दराडे , श्री एस बी जगताप, श्रीमती डी.पी. देसले, श्रीमती एच. डी.शिरसाठ, श्रीमती बहिरम यांनी करून घेतली. तसेच शाळेच्या सर्व बायस्रोत कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:56 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!