नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

कोल्हापुरात 1.30 कोटींचा विदेशी दारू साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

DPT NEWS 🗞️📰✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – विकी माने कोरोची

कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल ₹1 कोटी 30 लाख 50 हजार किमतीचा विदेशी दारूचा साठा व वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई 22 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. 1, कोल्हापूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता कोल्हापूर–पाचगाव मार्गावर सापळा रचून कारवाई केली. कारवाईदरम्यान MH-20-EG-1310 क्रमांकाच्या ट्रकची तपासणी दरम्यान परवाना नसताना बेकायदेशीररित्या वाहतूक केली जाणारी विदेशी दारू आढळून आली. ताब्यात घेतलेल्या ट्रकमधून 180 मिलीच्या 1600 बाटल्या (एकूण 76,800 मिली) जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत ₹1 कोटी 15 लाख 20 हजार इतकी आहे. याशिवाय संबंधित ट्रक व एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असून, सर्व जप्त मालाची एकूण किंमत ₹1 कोटी 30 लाख 50 हजार इतकी आहे.
या प्रकरणी रामजीवन विश्वराम विश्नोई (वय 26, रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65(a)(e), 83, 90, 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक संदीप साळवे, दुय्यम निरीक्षक अनुज वाघमारे यांच्यासह पथकाने यशस्वी कारवाई केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:34 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!