नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले, मित्रानेच मित्राला यमसदनी धाडले

Dpt news -धुळे : धुळ्यात अनैतिक संबंधातून मित्राने मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये खुणाचा गुन्हा दाखल झाला असून मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. शहरातील रासकर नगर भागात राहणाऱ्या निखिल साहेबराव पाटील याचे आरोपी असणाऱ्या मयूर शार्दूल याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यातून आरोपींनी निखिल पाटील याला रासकर नगर भागात त्याच्या राहत्या घरी जाऊन मारहाण केली आहे. झालेल्या बेदम मारहाणीमुळे हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मयूर शार्दूल याच्यासह दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर मयताला मयूर शार्दूल याच्यासह त्याच्या दोन भावांनी सुरुवातीला रासकर नगर येथे मारहाण केली. त्यानंतर त्याला तेथून उचलून नेत स्वराज्य जिम जवळ देखील मारहाण करण्यात आली. तसेच मयताचा भाऊ असणाऱ्या दीपक पाटील याला देखील आरोपींंनी मारहाण केल्याने तो जखमी झाला आहे. मयताला हिरे मेडिकल येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घडलेल्या घटनेमुळे धुळे पुन्हा एकदा गुन्हेगारीमुळे हादरले आहे.

दोन वर्षापासून आरोपी व मयत यांच्यात घनिष्ठ मैत्री

दोन वर्षापासून मयत निखिल पाटील व आरोपी मयूर शार्दूल यांच्यात चांगलेच घनिष्ठ मैत्रीचे संबंध होते. दोघेही सोबत काम करायचे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या अनैतिक संबंधावरून दोघांमध्ये धुसफूस सुरु होती. या कारणामुळे मयताच्या कुटुंबीयांनी मयतला काही दिवसासाठी बाहेर गावी देखील पाठविले होते. मात्र मयूर शार्दूलचा मयताच्या कुटुंबियांना वाढणारा त्रास पाहता निखिलच्या कुटुंबियांनी निखिलला पुन्हा धुळ्याला बोलवून घेतले होते. त्यानंतर काल त्यांच्यात वाद होऊन निखिल पाटील याचा आरोपींनी खून केला.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:40 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!