नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

चंदगड भूमी अभिलेख कार्यालयातील प्रशिक्षणार्थी रंगेहात लाच घेताना अटक

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – प्रा. नागेंद्र जाधव

चंदगड:- जमिनीची मोजणी, हद्दी निश्चिती व अंतिम नकाशा देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय, चंदगड येथे कार्यरत असलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विजय आप्पासाहेब कानडे वय 33, रा. बेळगुंदी, ता.गडहिंग्लज याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.या प्रकरणी 38 वर्षीय तक्रारदाराने 22 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार आरोपीने जमीन मोजणी व हद्दी ठरवून अंतिम नकाशा देण्यासाठी एकूण 8 हजार रुपयांची मागणी केली होती. यापैकी यापूर्वी 5 हजार रुपये स्वीकारल्याची कबुली देत उर्वरित 3 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
संबंधित तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 22 जानेवारी रोजी आरोपी विजय कानडे याला तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सापळा कारवाईदरम्यान आरोपीची अंगझडती पंचासमक्ष करण्यात आली असून तपासासाठी त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.याशिवाय आरोपीच्या घरझडतीसाठी स्वतंत्र पथक तात्काळ रवाना करण्यात आले असून झडतीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.सापळा कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात हवालदार संदीप काशीद, विकास माने, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील, कृष्णा पाटील व चालक गजानन कुराडे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:25 am, September 21, 2026
27°C
साफ आकाश
72 %
4 Km/h
Wind Gust: 3 Km/h
Clouds: 1%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:28 pm
Translate »
error: Content is protected !!