नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

राजे छत्रपती मार्शल आर्ट्स शाळेत हळदी-कुंकवाचा उत्साहात कार्यक्रम

आमदार ताईसो मंजुळा गावित यांच्या अध्यक्षतेखाली महिलांचा मोठा सहभाग

DPT NEWS🗞️📰✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी साकिब सैय्यद

पिंपळनेर:- पिंपळनेर येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथे दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री तालुक्याच्या आमदार ताईसो मंजुळा गावित या उपस्थित होत्या.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राजे छत्रपती इंग्लिश मीडियम प्रिन्सिपल सोनाली पाटील मॅडम, शिवसेना जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी संगीता पगारे, सुरेखा सूर्यवंशी, तृप्ती पाटील व मिसेस कुंभार तसेच विविध महिला कार्यकर्त्या, पालकवर्ग व परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून महिलांमधील आपुलकी, स्नेह आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ करण्याचा उद्देश यामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण केले.
यावेळी आमदार ताईसो मंजुळा गावित यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत महिलांच्या शिक्षण, स्वावलंबन व सामाजिक सहभागावर आपले विचार व्यक्त केले. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे यावे, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पालकांनी सजग भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. हळदी कुंकवा बरोबरच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात संगीत खुर्ची ईटिंग कॉम्पिटिशन फणी गेम इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रथम दुतीय तृतीय येणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित महिलांनी राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे शाळा व पालक यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या व्यवस्थापन, शिक्षकवृंद, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या व पालकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
4:56 pm, February 26, 2026
33°C
साफ आकाश
18 %
5 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 3%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!