नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

इचलकरंजी पोलिसांची मोठी कारवाई!

नशेसाठी वापरण्यात येणारे इंजेक्शनसह आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी- नारायण कांबळे

इचलकरंजी:- दि. २७ जानेवारी २०२६ इचलकरंजी पोलिसांनी नशा करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. नशेसाठी वापरण्यात येणारे MEPHENTERMINE SULPHATE INJECTION बाळगणाऱ्या आरोपी समर्थ दत्तात्रय चौगुले वय १९ रा. विवेकानंद नगर कोरोची ता. हातकणंगले पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून महागडा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडे बेकायदेशीररित्या नशेसाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन्स १०० बाटल्या, एक दुचाकी गाडी तसेच मोबाईल फोन आढळून आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६३,६५० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२३, १२५, २७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इचलकरंजी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून नशेच्या साखळीचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पो.सा.ई. गोविंद कोळेकर ,पो.हे.कॉ.उदय करडे, अनिल पाटील, अमर शिरढोणे, विजय माळवदे, राम पाटील ‌ यांनी केले आहे या धडक कारवाईमुळे नशेच्या व्यवसायात गुंतलेल्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नशेविरोधातील मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!